यावल, प्रतिनिधी – येथील युवा सामाजीक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते चेतन अढळकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या जनहित कक्ष जिल्हाध्यक्षपदी तर नायगाव तालुका यावल येथील कल्पेश पवार यांची मनसेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभागाची बैठक पक्षाचे राज्य विधीकक्ष राज्यध्यक्ष अॅड . किशोर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे येथील गणपती पॅलेसच्या सभागृहात पार पडली , या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा सचिव व शाडो कॅबिनेट गृहमंत्री अॅड .जमील देशपांडे , पक्षाचे राज्य उपाध्याक्ष धिरज देसले , मनसे महीला सेना अध्यक्ष प्राचीताई कुलकर्णी , धुळे जिल्हा अध्यक्ष दुष्यंत राजे देशमुख यांच्या प्रमुख उपास्थितीत संपन्न झालेल्या उत्तर विभागाच्या बैठकीत चेतन अढळकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन कोरोना विषाणु संसर्गाच्या काळाळ शहरात नागरीकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने विविध समाज हिताचे लक्ष वेधणारे उपक्रम राबविले.
तसेच पक्षाच्या माध्यमातुन अनेक नागरीक समस्या व प्रश्न मार्गी लावविण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली याची दखल घेत मनसेचे महाराष्ट्र प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाने त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जनहित कक्ष विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे .पक्षाच्या जनहित विधी विभागाचे राज्य अध्यक्ष अॅड किशोर शिंदे यांच्या हस्ते हे निवड पत्र देण्यात आले आहे . तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या . यावल तालुका अध्यक्षपदी कल्पेश पवार यांची तालुका उपाध्यक्षपदी शाम पवार, शहराध्यक्षपदी किशोर नन्नवरे तसेच यावल शहर उपप्रमुखपदी नितिन डांबरे यांची निवड करण्यात आली आहे . निवड झालेल्या सर्व पदधिकारी यांचे मनसेचे जळगाव जिल्हा सचिव अॅड .जमील देशपांडे व उपस्थित सर्व पदधिकारी यांनी स्वागत केले आहे .