भुसावळ : प्रतिनिधी । बोदवड येथील २ लाखाची लाच मागणाऱ्या बोदवडच्या लाचखोर तहसीलदारासह त्याच्या २ साथीदारांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
शेतीच्या उतार्याबाबत काढलेली नोटीस परत घेण्याच्या मागणीसाठी शेतकर्याकडे दोन लाखांची लाच मागणार्या बोदवड तहसीलदारांसह सर्कल व तलाठ्यास जळगाव एसीबीच्या पथकाने लाच घेताना शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले होते. तिघा आरोपींना शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तहसीलदार हेमंत भागवत पाटील (40, रा.भरडी, ता.जामनेर, ह.मु.बोदवड), मंडळाधिकारी संजय झेंडू शेरनाथ (47, प्रभाकर हॉलजवळ, श्रीराम निवास अपार्टमेंट, दुसरा मजला, ब्लॉक नं.6, भुसावळ) व तलाठी निरज प्रकाश पाटील (34, हेडगेवार नगर, बोदवड) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
फैजपूर येथील 53 वर्षीय शेतकर्याने त्यांच्या पत्नीच्या नावे 2002 मध्ये बोदवड तहसीलच्या हद्दीत शेत खरेदी केले या शेतीच्या 7/12 उतार्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावण्यात आले मात्र कालांतराने या शेतीच्या उतार्यावर परत मूळ मालकाचे नाव आल्याने तक्रारदार यांनी मंडळाधिकारी यांना भेटून पुन्हा शेतीच्या 7/12 उत्तार्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावले व उतारा घेतला.
या उतार्याबाबत तहसीलदार, बोदवड यांनी हरकत घेऊन संबंधीत पुरावा देण्याची नोटीस काढली व सदर काढलेली नोटीस रद्द करण्याच्या तहसीलदारांच्या वतीने मंडळाधिकारी व सर्कल यांनी सुरूवातीला 6 व 8 तसेच 9 डिसेंबर रोजी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती व नंतर दोन लाखात तडजोड करण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती व अत्यंत बारकाईने या प्रकरणी पडताळणी करण्यात आल्याने शुक्रवारी सापळा लावून तो यशस्वी करण्यात आला. मंडळाधिकार्यांनी लाच स्वीकारताच सुरूवातीला त्याच्या व नंतर दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.