जळगाव – दिव्यांग व वयोवृध्द व्यक्तींचे आयुष्य आनंदी करणे, त्यांना ज्येष्ठत्वाची ओळख, ज्येष्ठ व्यक्तींना भेडसवणाऱ्या समस्या व उपायोजना, ज्येष्ठ नागरिकासाठी असणाऱ्या कायद्यांची ओळख, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांची ओळख याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
याबाबतचे प्रशिक्षण संस्था सावली, सीएफआर, हेल्पेज इंडिया, फेस्कॉम व एएससीओपी या संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण मर्यादित व्यक्तींना असून या प्रशिक्षणासाठी 9860964323 या भ्रमणध्वनी/ व्हॉटसॲप नंबरवर दिव्यांग व वयोवृध्द व्यक्तींनी नोंदणी करावी. असे आवाहन श्री. योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी केले आहे.