Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अयोध्या नगरमध्ये १९ वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या

by Divya Jalgaon Team
December 18, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
अयोध्या नगरमध्ये १९ वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या

जळगाव- अयोध्या नगरमध्ये राहणाऱ्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय तरूणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले.

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नसून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या जान्हवी मिलिंद खडके (वय-१९ रा. हनुमान मंदीराजवळ अयोध्या नगर) या तरूणीने शुक्रवारी मध्यरात्री राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली. मुलीने आत्महत्या केल्याचे पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता. आत्महत्या करण्या मागचे कारण अद्याप कळू शकले नाही.

एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. वडील हे किराणा दुकान चालवितात तर आई गृहिणी आहे. एकुलती एक मुलगीने आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली होती. दरम्यान गुरूवारी रात्री उशीरापर्यंत जान्हवी आईवडीलांश चांगल्या गप्पा मारल्या होत्या. पश्चात वडील मिलींद, आई हर्षा, लहान भाऊ जतीन असा परिवार आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोउनि रामकृष्ण पाटील, पोकॉ नरसिंग पाडवी, सचिन मुंडे यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केला. आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच नातेवाईकांना जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोउनि रामकृष्ण पाटील करीत आहे.

Share post
Tags: #Ayodhya Nagar#Suicide CasecrimeJalgaonMarathi Newsअयोध्या नगरमध्ये १९ वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या
Previous Post

का अशा शाळेला आयएसओ मानांकन मिळणार नाही? – गुणवंत सोनवणे

Next Post

वीर जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post
वीर जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वीर जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group