जळगाव – खेडी शिवारातील एका हॉटेलमध्ये दोन गटात वाद झाला घटनास्तळी पिस्तूल काढल्यामुळे तणाव निर्माण झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जळगाव शहराला लागून खेडी शिवार येथे १३ डिसेंबर रोजीच्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास न्यू महिंद्रा ढाबा याठिकाणी अनिल छबिलदास चौधरी (रा. भुसावळ) व मुकेश दत्तात्रय माळी (रा. जळगाव) या दोघांच्या समर्थकांमध्ये जेवणानंतर किरकोळ वादातून हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपास करायला सुरुवात. केली. पोलीस तपासात ढाब्याचे मालक तुषार फकीरा बाविस्कर यांना पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुकेश दत्तात्रय माळी (नगरसेवक सुनील माळी यांचा भाऊ) व त्यांच्यासोबत असलेले तीन ते चार जेवणासाठी आले होते.
थोड्याच वेळात अनिल शब्दास चौधरी. भगत बालानी (रा.सिंधी कॉलनी जळगाव) यांच्या सोबतही ३ जण जेवणासाठी आले होते. जेवण आटोपल्यावर अनिल चौधरी यांनी एका खुर्चीला लाथ मारल्यावरून मुकेश माळी व अनिल चौधरी यांच्यात बाचाबाची सुरू झाली. दोघेजण एकमेकांवर धावून आले तेव्हा, अनिल चौधरी सोबत असलेल्या एका इसमाने कमरेतून हातात रिवाल्वर काढले. त्यानंतर दोन्ही गटांनी आपसात भांडण मिटवून निघून गेल्याचे सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघितले असता केदारनाथ वामन सानप हा त्याच्या कमरेतून पिस्तुल हातात घेऊन भांडण करीत असताना दिसून आला.
दरम्यान, या संदर्भात पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेश अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून अनिल चौधरी, केदारनाथ सानप, दुर्गेश ठाकुर, अनिल चौधरी यांचा ड्रायव्हर गोलू (सर्व राहणार भुसावळ) तसेच भगत रावलमल बालाणी तसेच दुसर्या गटातील मुकेश माळी, छोटू पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या तीन जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमून गर्दी करून दंगा केला. तसेच आरोपी सानप याने त्याच्या ताब्यातील रिव्हॉल्वर काढून मुकेश माळी छोटी पाटील व इतर तिघांना धाक दाखविण्याच्या उद्देशाने काढून त्याच्याकडे असलेल्या परवान्याच्या नियमाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.