जळगाव प्रतिनिधी । विवाहितेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी १६ हजार रूपये किंमतीचा सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवार १२ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी आज मंगळवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
झाकीर हुसेन कॉलनी, गाडगेबाबा चौक येथील राहणाऱ्या प्रतिभा गणेश ठोबरे (वय – ३८) ह्या पतीसह राहतात. अमळनेर येथे नातेकवाईकांकडे कामाच्या निमित्ताने गावी जाण्यासाठी १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नवीन बसस्थानकात आले. दुपारी २.३० ते वाजेच्या सुमारास जामनेर शहादा बसमध्ये चढत असतांना त्यांच्यापर्स मधून अज्ञात चोरट्यांनी १६ हजार रूपये किंमतीचे सोन्याच्या २ वाट्या आणि ३ ग्रॅमचे मनी चोरून नेला.
हा प्रकार सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास लक्षात आला. त्यांनी तातडीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.