बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी प्रत्येक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असते. तसेच ती सेलिब्रेशनची देखील जोरदार तयारी करत असते. याचे फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत राहते. डिसेंबर येताच प्रत्येकजण उत्सवाच्या आनंदात भारावून जात असतो. अशा परिस्थितीत शिल्पा ख्रिसमसच्या तयारीत व्यस्त असून तिच्यासोबत मुलगा वियान देखील ख्रिसमस ट्री डेकोरेशनसाठी मदत करत आहे. शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत वियानसोबत ख्रिसमस ट्री डेकोरेट करताना शिल्पा दिसत आहे.
यावेळी वियान हा कॅंडी केन खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, मला वाटले की, कॅंडी केन खपूच टेस्टी असेल. या सणासाठी एकत्रितपणे झाडे सजवणे ही एक आवडती परंपरा आहे, हा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, शिल्पा शेट्टीने यापूर्वी करवाचौथ आणि दिवाळी सेलिब्रेशनचे व्हिडिओ देखील पोस्ट केले होते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास शिल्पा शेट्टी लवकरच मोठ्या पडद्यावर चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. ती ‘निकम्मा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. या तिच्यासोबत अभिमन्यू दासानी काम करत आहे.