Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

१० वी ची परीक्षेसाठी १५ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार

by Divya Jalgaon Team
December 13, 2020
in राज्य, शैक्षणिक
0
शासकीय कोट्यातील जागा भरण्यासाठी विशेष फेरीचे आयोजन

मुंबई : कोरोनामुळे यंदा शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी असली तरी ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आला आहेत. परीक्षा कधी आणि कशा घेणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही मात्र 23 नोव्हेंबरपासून राज्यातील ग्रामीण भागातील 9 ते 12 वी शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यात आली आहे. याशिवाय ऑनलाइन अभ्यासक्रम देखील पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

2021मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सोमवारी म्हणजेच 15 डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी सरल डेटा बेस वरून 15 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान अर्ज भरू शकणार आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेतलेले विद्यार्थी 5 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान अर्ज भरू शकणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे इथून ऑनलाइन पत्रक जारी करण्यात आलं आहे.

कसा भरायचा अर्ज

www.mahahssc board.in या संकेतस्थळावर जाऊन तिथे आपण इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी अर्ज भरू शकणार आहात. तिथे आपलं नाव, वैयक्तीक माहिती आणि विषय इत्यादी माहिती भरायची आहे. हा फॉर्म भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून लॉगइनमधून प्री लिस्ट दिली जाणार आ़हे. या प्रीलिस्टची प्रिंट काढून त्यावर विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करावी आणि महाविद्यालयाकडे जमा करावी.

या संबंधीची अधिक तपशील www.mahahssc board.in या संकेतस्थळावर HSC एप्रिल-मे ऑनलाइन अॅप्लिकेशन इथे उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी ते नीट वाचून भरावेत. कोरोनाच्या संसर्गामुळे अजूनही 100 टक्के शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यात आली नसली तरी ऑनलाइन माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. जानेवारीमध्ये महाविद्यालयं 100 टक्के सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार परीक्षा ऑनलाइन होणार की लेखी याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share post
Tags: 10 th१० वी ची परीक्षेसाठी १५ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार15 DecemberDivya JalgaonEducationExamMarathi NewsMumbai NewsOnline Exam
Previous Post

एलआयसीः ही सुविधा विनामूल्य देणार; जाणून घ्या

Next Post

3 महिन्यांपर्यंत रेशन न घेतल्यास, कार्ड रद्द होऊ शकतं; जाणून घ्या

Next Post
3 महिन्यांपर्यंत रेशन न घेतल्यास, कार्ड रद्द होऊ शकतं; जाणून घ्या

3 महिन्यांपर्यंत रेशन न घेतल्यास, कार्ड रद्द होऊ शकतं; जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group