यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चिखली खुर्द येथे आमदार निधीतून रस्त्याचे कॉंक्रिटीकरण मार्गाच्या मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन यावल रावेर विधानसभेचे आमदार शिरिष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले .
यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावातील मार्गावरील सुमारे पाच लाख रुपये आमदार निधी रस्त्याचे कामाचे भूमीपुजन तत्कालीन सरपंच सुमनताई वाघ यांच्यासह आदी ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत व चिखली खुर्द या गावातील रस्त्याच्या कामाचे आज आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते भुमीपुजन करून कामांचे श्रीगणेश करण्यात आले .दरम्यान चिखली येथील सोसायटी कार्यालय मध्ये उपस्थित मान्यवरांचे सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे , यावल पंचायत समितीचे गटनेता शेखर सोपान पाटील , युवा काँग्रेस नेते धनंजय भाऊ चौधरी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे , काँग्रेस ओबीसी सेलचे यावल तालुका अध्यक्ष अमोल भिरूड काँग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष अशोक पाटील , ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच राजेंद्र पाटील माजी सरपंच केशवराव पाटील ग्रामसेवक संजय चौधरी पोलीस पाटील रवींद्र सावळे, चिखली सोसायटी चेअरमन सुरेश पाटील , प्रभाकर पाटील , माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पाटील हर्षल पाटील पुंडलिक महाराज प्रेमचंद पाटील संतोष पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने या कार्यक्रमास उपस्थित होते