Amazon Great Indian Festival sale 2020: सण उत्सवामध्ये किंवा त्याआधी मोठ्या डिस्काऊंटमध्ये नवनवीन प्रॉडक्ट्स खरेदी करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. Amazon चा Great Indian Festival या सेलची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून होत आहे. अॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी Great Indian Festival हा सेल २४ तास आधीच सुरु होणार आहे. म्हणजेच प्राइम मेंबर्ससाठी सेल सध्या उपलबद्द सुरु झाला आहे.
हा सेल पाच दिवस चालणार आहे. या सेलमध्ये मोबाइल फोन्स, अक्सेसरीज आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह अन्य कॅटिगरीजचे प्रॉडक्ट्सवर मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्या मोठी सूट देणार असल्याची घोषणा केली आहे. टेलिव्हीजन ब्रँड ‘शिंको’ने स्मार्ट टीव्हीवर एक खास आणि मोठ्या ऑफरची घोषणा केली आहे. ‘शिंको’ कंपनीने आपल्या SO328AS (32 इंच) मॉडलला अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये फक्त ३ हजार २३२ रुपयांत विक्रीसाठी उपलबद्ध केलं आहे.
स्मार्ट स्पीकरच्या किंमतीत तुम्हाला स्मार्ट TV विकत घेण्याची संधी या सेलमध्ये उपलबद्ध झाली आहे. ‘शिंको’ कंपनीने रिलीज पाठवून याची माहिती दिली आहे. ग्रेट इंडियन फेस्टिवलच्या फ्लॅश सेलमध्ये ३२ इंचाचा SO328AS स्मार्ट टीव्ही फक्त तीन हजार २३२ रुपयांत मिळणार आहे. या स्मार्ट टिव्हीचा फ्लॅश सेल १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. कंपनीचा दुसरा वर्धापन दिवस असल्यामुळे३२ इंचाचा टीव्ही केवळ ३ हजार २३२ रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या वर्धापन दिनाला ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही केवळ अॅमेझॉन सेलमध्ये ५ हजार ५५५ रुपयात अॅमेझॉनच्या या सेलमध्ये उपलबद्ध होता, अशी माहिती शिंको इंडियाचे फाउंडर अर्जून बजाज यांनी दिली.
शिंको कंपनीने आपल्या स्मार्ट टीव्हीमध्ये युनिवॉल युजर इंटरफेस, अँड्रॉयड८ यासारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय, यात HRDP टेक्नॉलजी, 3 HDMI , दोन यूएसबी पोर्ट, ए-५३ क्वाड-कोर प्रोसेसर, १ जीबी रॅम व ८ जीबी स्टोरेज, २० व्हॅट स्पीकर्स आणि ब्लूटूथसह अनेक फीचर्स दिले आहेत. ४ के, फुल एचडी आणि एचडी रेडी स्मार्ट टीव्ही आणि एचडी रेडी एलईडी टीव्हीवरही कंपनीने मोठी सूट दिली आहे. शिंको कंपनीने नो कॉस्ट ईएमआयची ऑफर सुद्धा दिली आहे.