जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे जळगाव जिल्ह्यात 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर, 2020 पर्यंत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, बार्टीच्या योजना विभाग प्रमुख दिप्ती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन व महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने राज्यभर बार्टीच्या समतादूतांमार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
जळगाव शहरात संविधान दिनानिमित्त रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले. याप्रसंगी बार्टीच्या जळगाव जिल्हा प्रकल्प अधिकारी भागयश्री पाईकराव, समतादूत चंद्रकांत इंगळे, सरला गाढे, सविता चिमकर, कल्पना बेलसरे, युनुस तडवी, शिल्पा मालपूरे, अर्चना किरोते, जयश्री चौधरी, स्नेहा चौधरी, नितीन भोई, अक्रम शेख, महेंद्र मराठे, शांताराम हटकर, अर्जुन गायकवाड आदि समातदूत उपस्थित होते. बार्टीच्या समतादूतांमार्फत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जिल्हाभरातील नागरीकांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे जिल्हा प्रकल्प अधिकारी, समातादूत प्रकल्प, बार्टी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.