चाळीसगाव- शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियानच्या अंतर्गत सहज जलबोध अभियान च्या माध्यमातून रविवार दि.६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे अंत्योदय जनसेवा कार्यालय, चाळीसगाव येथें आदर्श पाणलोट आराखडा प्रशिक्षण वर्गात जल आराखडे तयार करण्या संदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते . त्यात तालुक्यात निवडण्यात आलेल्या एकूण २६ गावांतील पाणी समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. उपस्थित सर्व पाणी समिती सदस्यांना सहज जलबोधकार उपेंद्र धोंडे ( पुणे ) यांनी ऑनलाइन झूम मीटिंग च्या माध्यमातून मार्गदर्शन केलें तसेच आतापर्यंत सदर गावांमध्ये झालेल्या कामांचा देखील आढावा घेतला.
या कार्यशाळेत गुणवंत सोनवणे संगणक अभियंता पुणे हे देखील ऑनलाइन उपस्थित होते. तालुक्याचे आमदार व शिवनेरी फाउंडेशनचे मार्गदर्शक मंगेशदादा चव्हाण यांनी झूम मीटिंग च्या माध्यमातून पाणी समितीच्या सदस्यांशी संवाद साधुन येणाऱ्या दिवसात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जल समृद्ध आणि पर्यावरण समृद्ध गावे उभे राहावेत या साठी सुरू झालेल्या भूजल अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि आपआपली गावे जलसाक्षर करूया आणि यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत आपण लोकप्रतिनिधी या नात्याने करणार आहोत असें आश्वस्त केले आणि येणाऱ्या काही दिवसांत २६ गावांचे जल आराखडे तयार झाले की पुढच्या टप्प्यात तालुक्यातील इतर एकूण १०० गावांचे जल आराखडे आपण तयार करणार आहोत आणि संपूर्ण तालुक्यात ही जल चळवळ आणखी तीव्र अन मोठी करणार आहोत असे मत सहज जलबोधकार उपेन्द्र धोंडे आणि संगणक अभियंता गुणवंत सोनवणे यांनी मांडले.