जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात ४० नवे बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ६३ कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५४ हजार ८३८ पर्यंत पोहचली असून ५३ हजार ०८२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आतापर्यंत १३०५ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ४५१ रुग्ण सध्या उपचार घेताय.
जळगाव शहर –२२, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ- ०२, अमळनेर- ००, चोपडा-०२, पाचोरा-००, भडगाव-००,धरणगाव-००, यावल-०२, एरंडोल-००, जामनेर-०३, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-०५, मुक्ताईनगर-०१, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ४० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.