Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आ. महाजनांना धमकी देणाऱ्या आरोपीस चार दिवसांची कोठडी

by Divya Jalgaon Team
October 16, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
jmaner

जामनेर, प्रतिनीधी। ग्लोबल हॉस्पिटल लोकार्पण कार्यस्थळ बॉम्बने उडवून लावण्याची धमकी देणारा पहूर पेठ येथील अमोल देशमुख यास अटक करून न्यायालयात सादर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

१३ रोजी येथील ग्लोबल हॉस्पिटल च्या लोकार्पण सोहळा निमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे येणार असल्याने त्या कार्यक्रमाचे नियोजन माजी मंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे व त्यांचे सहकारी करीत होते. दीपक तायडे यांना दुपारी ३:१८ वाजेच्या सुमारास ८२६५००५४६९ या निनावी मोबाईल फोन वरून धमकीचा फोन आला होता. त्यात तो व्यक्ती म्हणत होता की,

आपने कार्यक्रम जहा रखा हैं वहा मैने बॉम्ब रखे हैं ये बात मै आपको बता रहा हुं आपको क्या करना है वो आप देखो असे म्हटल्या नंतर कार्यक्रम स्थळी येथील पोलीस स्टेशनचे सपोनी धरमसिंग सूंदर्डे यांना सदरील कॉल वरील संभाषण स्पीकर ऑन करून एकविले असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर पुन्हा दीपक तायडे यांच्या मोबाईल फोनवर त्याच नंबर वरुण दुपारी ३:३७ वाजेला टेक्स्ट मेसेज आला होता.

त्याचा मजकूर असा आहे.की ५ बजे तक १ करोड रुपये भेज दे महाजन को बोल नही तो बहोत बडा ब्लास्ट हो जायेगा मेरे आदमी मालेगाव मे बैठे हैं नंही तो तुमारी मर्जी मै मेरा काम करके निकल जाऊंगा.असा टेक्स्ट मेसेज पाठऊन क्षती पोहचविण्याची धमकी देऊन,एक करोड रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मोबाईल क्र ८२६५००५४६९ च्या धारकाविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशन मध्ये दीपक तायडे यांनी कायदेशीर फिर्याद दाखल केली होती.

त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेण्यासाठी एल सी बी सायबर पथक व जामनेर पोलीस स्टेशनचे पथक नेमून पाचोरा, पिंपळगांव हरेस्वर, पहूर परिसर पिंजून काढला असता तांत्रीक पद्धतीने आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा पहूरपेठ येथील अमोल राजू देशमुख असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यास दि.१५ रोजी ताब्यात घेतले असून सदर आरोपी अमोल देशमुख हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाचोरा आगारात वाहक म्हणून कार्यरत आहे.

Share post
Tags: AcusedCrime newsGirish MahajanJalgaonJamnerPolice Custody
Previous Post

यावल शहरात वाळूची चोरी करणारा डंपर पकडला

Next Post

१७ ऑक्टोबरपासून महिलांसाठी लोकल सेवा सुरु

Next Post
local news

१७ ऑक्टोबरपासून महिलांसाठी लोकल सेवा सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group