जळगाव प्रतिनिधी । भाजीपाला विक्रेत्याची कृउबा समितीमधून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील रथ चौकातील मणियार मोहल्ल्यातील मोहसिन शहा सलिम शहा (वय-३५) हे आपल्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोहसिन हे लसून व अद्रक विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ते एमएच ४८ ऐएस ८३०७ क्रमांकाच्या मोटारसायकलने पहाटे ४ वाजता दुकानावर आले आणि त्यांनी मोटारसायकल दुकानासमोर लावली.
त्यानंतर ते बाजारापेठेत लसून व अद्रक विकण्यासाठी निघून गेले. माल विक्री झाल्यानंतर सकाळी ८ वाजेच्या सुमारास आपल्या दुकानाजवळ आले. त्यांना मोटारसायकल दिसून न आल्याने त्यांनी सर्वत्र तिचा शोध घेतला. परंतु मोटारसायकल तरी देखील मिळून न आल्याने त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केले. त्यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.