Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ट्रॅक्टरच्या धडकेत रिंगणगावचा तरुण जागीच मृत्यू

by Divya Jalgaon Team
December 5, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
ट्रॅक्टरच्या धडकेत रिंगणगावचा तरुण जागीच मृत्यू

एरंडोल – तालुक्यातील रिंगणगाव येथील राहणाऱ्या तरुणाचा ट्रॅक्टरच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ट्रॅक्टर हे खोल खड्ड्यात पडल्याने त्याखाली तरुण दाबल्या गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

मयत झालेल्या तरुणाचे नाव सचिन श्रीराम सुरसे असे आहे. सचिन सुरसे (वय ३०, रा.रिंगणगाव ता.एरंडोल) हा बुधवारी रात्री अशोक नामदेव मते यांच्या शेतात कामासाठी निघाला होता. रात्री रिंगणगाव-विखरण रस्त्याने जाताना सचिनला ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच.१९-सी.वाय.१३०८) धडक दिली. रस्त्यावरून जाणारे सचिन जगताप यांनी सचिनचा भाऊ समाधान सुरसे यांना अपघाताची माहिती दिली.

दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर पाटाजवळील खोल खड्ड्यात पलटी झाले. सचिन ट्रॅक्टरखाली सचिन दाबला गेला. समाधान व सचिन जगताप यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला ट्रॅक्टर खालून काढून एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. समाधान सुरसे यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक शरद आनंदा शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करत आहे.

Share post
Tags: #ErandolAccidentcrimeDeathDivya JalgaonErandol NewsJalgaonJalgaon Latest NewsMarathi Newsट्रॅक्टरच्या धडकेत रिंगणगावचा तरुण जागीच मृत्यू
Previous Post

भावाने केलेल्या मारहाणीत लहान भावाचा जागीच मृत्यू; गुन्हा दाखल

Next Post

बहिणीसोबत प्रेम संबंधाच्या संशयातून तरूणावर ब्लेडने वार

Next Post
जळगावात शहर पोलीस स्थानकात जुन्या भांडणाच्या कारणावरून हाणामारी

बहिणीसोबत प्रेम संबंधाच्या संशयातून तरूणावर ब्लेडने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group