Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Breaking : रावेरमध्ये चार भावंडांची निर्घृण हत्या

by Divya Jalgaon Team
October 16, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
धक्कादायक : सावखेडा शिवारातील ४० वर्षीय व्यक्तीचा खून, संशयित अटकेत

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवारात चार भावंडांची निर्घृण हत्या केल्याचा भयंकर घटना  आज सकाळी उघडकीस आला. या हत्येमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे. यात मुलींचा समावेश आहे. घटनास्थळी रावेर पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे.

रावेर शहरालगत अंतरावरील बोरखेडा शेत शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात गेल्या अनेक वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी आणि दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. मध्यप्रदेशात त्यांचे नातेवाईक राहतात. त्यांचे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात १५ ऑक्टोबर रोजी गेले होते.

दरम्यान दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते. चारही भावंडे जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात व्यक्ती कुऱ्हाडीने वार करून चारही भावंडांची हत्या केली. सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आले असता घर बंद दिसले. घरात डोकावून पाहिले असता. चारही मुलांचे मृतदेह आणि रक्तांचा सडा दिसून आला. हा भयंकर प्रकार पाहून शेख मुस्ताक यांनी रावेर पोलीसांना माहिती दिली. मयतामध्ये दोन मुलींचा समावेश आहे.

पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे, सपोनि शितलकुमार यांच्यासह पोलीसांचा ताफा दाखल झाला आहे. नेमकी हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप कळू शकले नाही.

आज झालेल्या हत्याकांडामुळे संपुर्ण जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. पाच वर्षांपुर्वी जळगाव तालुक्यातील भादली येथे एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. अद्यापपर्यंत हत्या करणाऱ्या आरोपींची शोध घेण्यास जिल्हा पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. आजही त्याच प्रकारच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक डॉ. प्रविण मुंढे आणि पोलीस यंत्रणेला आरोपी शोधण्यासाठी आता आव्हान राहणार आहे.

अपर पोलीस अधिक्षक चंद्रकात गवळी यांनी घटनास्थळी दाखल झाले आहे. जळगाव येथून श्वान पथक आणि फिंगर प्रिंट, शोध पथक रवाना झाले आहे. मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीने वार करून पळ काढल्यानंतर काही संशयित वस्तू मिळतात का? याचा शोध घेणे सुरू आहे. रावेर पोलीस पथक शेतशिवारातील संपुर्ण परिसर पिंजून काढत आहे.

Share post
Tags: 4 Brother MurderBorkheda RoadcrimeJalgaonMurderRaver
Previous Post

बाँबस्फोटाची धमकी देणारा निघाला बसचा वाहक

Next Post

GST : केंद्राकडून कर्ज उभारण्याचा निर्णय

Next Post
GST news

GST : केंद्राकडून कर्ज उभारण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group