जळगाव – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव शहर कार्याध्यक्षपदी तुषार इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब मा अजितदादा पवार मा जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे व संघटन मजबूत करण्याचे काम करेल अशी अपेक्षा नूतन युवक कार्याध्यक्ष तुषार रमेश इंगळे यांनी व्यक्त केली आहे.
आज तुषार रमेश इंगळे यांचा जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच यावेळी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे कुणाल पवार राजेश पाटील लता मोरे आदींची यावेळी उपस्थिती होती