जळगाव – महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्हा कार्यकारीणीच्या वतीने वीर भाई कोतवाल यांची जयंती शानबाग सभागृहात साजरी करण्यात आली.
यावेळी ह.भ.प.श्री मनोहर खोंडे जळगाव जिल्हा कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष यांचे हस्ते वीर भाई कोतवाल यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा अध्यक्ष रविंद्र (बंटी) नेरपगारे यांनी व खोंडे सर यांनी हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या देशभक्ती व कार्याविषयी माहिती दिली.
तसेच रविंद्र (बंटी) नेरपगारे जिल्हाध्यक्ष यांनी हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचा अर्धाकृती पुतळा जळगाव शहरात महानगरपालिकेच्या वतीने लवकरच बसविण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी जिल्हा कार्यकारीणी कार्याध्यक्ष पृथ्वीराज सोनवणे व जिल्हा सचिव कुमार सिरामे, संस्थेचे प्रमुख पदाधिकारी जगदिश वाघ, जगदिश निकम, अशोक महाले, भिकन बोरसे, मनिष कुवर , महारू इसे, प्रकाश बोरसे, संजय सोनवणे, अरुण बोरसे, बंटी ठाकरे हे पदाधिकारी उपस्थित होते.