Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव बसस्थानकातून एकाचा मोबाईल लंपास

by Divya Jalgaon Team
December 2, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील नवीन बस स्टॅन्डजळवळून ५ हजार किमतीचा मोबाईल लंपास

जळगाव – जळगाव बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना एकाच्या खिश्यातून ९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सुरेश तारांचंद पाटील (वय-४९ रा. शिंदखेडा जि.धुळे) हे कामाच्या निमित्ताने जळगाव येथे नातेवाईकांकडे आले होते. काम आटोपून घरी जाण्यासाठी ते सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानकात आले. यावेळी जळगाव-अमळनेर बस सायंकाळी ७.४५ वाजता बसस्थानक प्लॅटफार्मवर आली. सुरेश पाटील हे बसमध्ये चढत असतांना शर्टाच्या खिश्यातून ९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याचे बसमध्ये बसल्यावर रात्री ८ वाजता लक्षात आले.

चोरट्यांचा शोध घेतला असता त्यांना कोणीच मिळून आले नाही. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेतली. सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. पुरूषोत्तम वागळे करीत आहे.

Share post
Tags: crimeJalgaonJalgaon newsMobile Robberyrobberyजळगाव बसस्थानकातून एकाचा मोबाईल लंपास
Previous Post

पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीतून दुचाकीची चोरी

Next Post

रस्त्याची दयनिय अवस्था झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन

Next Post
रस्त्याची दयनिय अवस्था झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन

रस्त्याची दयनिय अवस्था झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group