मुंबई – कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरातही शिरकाव केला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यानंतर आता चित्रपट अभिनेते आणि भाजपाचे गुरूदासपुरचे खासदार सनी देओल यांना करोनाची लागण झाली आहे आहे. याबाबत हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव यांनी मंगळवारी त्यांना करोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.
सनी देओल गेल्या काही महिन्यांपासून कुल्लू येथे वास्तव्यास होते. सनी देओल आणि त्याचे मित्र मुंबईकडे रवाना होण्याची तयारी करत होते. परंतु त्यादरम्यान मंगळवारी सनी देओल यांना करोनाची लागण झाली.