जळगाव – के. सी. ई. सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालय जळगावच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी द्वारा ‘हस्तमुद्रा आणि प्राणायाम शिबीर’ तसेच ‘वेटलॉस अँड फिटनेस’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड – १९ महामारी च्या काळात प्रत्येकाच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा समतोल बिघडलेला आहे.
तसेच वर्क फ्रॉम होम मुळे शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे वजन वाढण्याची समस्या दिसून येते. या परिस्थितीमध्ये मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तर आपण शारिरीक विकारांवर मात करू शकतो. त्यासाठी सर्वांसाठी उपयुक्त आणि सर्वांना करता येईल असा शारीरिक आणि मानसिक विकारांवर प्राणायाम आणि मुद्रांच्या अभ्यासाने आपणास शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक प्रगती साधता येते.
या शिबिराने तुम्हाला मासिक पाळीतील अनियमितता, पोटावरील चरबी वाढणे, बेली फॅट , ताण-तणाव, निद्रानाश, थायराइड, स्थूलता, मधुमेह, हृदयविकार, पचनशक्ती, वात विकार, गुडघेदुखी, स्मरणशक्ती इत्यादी अनेक विकारांसाठी लाभदायक ठरणार आहे. शिबिराचे आयोजन 7 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहे. याशिवाय माजी विद्यार्थ्यांसाठी आणि नियमित योगसाधना करण्याऱ्या साधकांसाठी ‘एडव्हान्स योग प्रॅक्टिस बॅच’ सकाळी ६:३० ते ७:३० या वेळात, विकारग्रस्त आणि जेष्ठ नागरिकांसाठी ८ ते ९ या वेळात योग संजीवन वर्गांचे आयोजन मू. जे. महाविद्यालयाच्या योग हॉलमध्ये करण्यात येत आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी ९११२२८८११०, ८३९०७६६९०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. योगाच्या विविध कार्यशाळे सोबतच योग विषयात करीअर करण्याच्या उद्देशाने योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम आणि एम. ए. योगिक सायन्स या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियासुद्धा ऑनलाईन सुरु असल्याची माहीती योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी दिली आहे.