मुक्ताईनगर प्रतिनिधी । लेवा पाटीदार समाज युवा मंडळ २०२०-२१ या वधू-वर परिचय सूचीचे रविवारी, खडसे फॉर्महाऊसवर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. लेवा पाटीदार समाज युवा मंडळाच्या यंदाच्या वधू-वर परिचय सूचिचे प्रकाशन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
लेवा पाटील पाटीदार समाज युवा मंडळाने तयार केलेली विवाहेच्छुक तरुण- तरूणींचा परिचय करून देणारी सूची यंदा तिसर्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यात उपवरांची शैक्षणिक, कौटुंबिक व नोकरी-व्यवसायाची माहिती नोंदवली आहे. दरम्यान, ही सूचि विवाहेच्छुकांसह पालकांच्या उपयोगी पडणार असल्याचे प्रतीपादन एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. तेजांशू सरोदे, डॉ.शुभम खर्चे, राजेंद्र पाटील, डिगंबर खर्चे, डिगंबर खडसे, चंद्रशेखर बढे, प्रल्हाद जंगले, योगेश कोलते, प्रा. पी. पी. लढे आदी उपस्थित होते.


