Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सिलेंडरच्या होम डिलिव्हरीची प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून बदलणार

by Divya Jalgaon Team
October 16, 2020
in राष्ट्रीय
0
स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित नियमात होणार बदल; जाणून घ्या

नवी दिल्ली : आता एलपीजी घरगुती गॅसची होम डिलिव्हरीच्या (LPG Cylinder Home Delivery) संपूर्ण प्रणालीमध्ये बदल होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून घरगुती सिलेंडर्सची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख होण्यासाठी तेल कंपन्यांकडून नवीन एलपीजी सिलेंडरची सिस्टम लागू केली जाणार आहे. काय आहे ही नवीन प्रणाली आणि कशी होणार तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी, याबाबत इथे वाचा सविस्तर-

-या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड. आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला कोड सांगावा लागेल. त्यानंतरच तु्म्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल.

-जर एखाद्या ग्राहकाने त्याचा मोबाइल नंबर डिस्ट्रिब्युटरकडे अपडेट केला नसेल, तर डिलिव्हरी बॉयकडे याबाबतचे एक App असेल. ज्या माध्यमातून तुम्ही त्या क्षणीच तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करू शकता आणि ज्यानंतर कोड मिळेल.

-ज्या ग्राहकांचा पत्ता किंवा मोबाइल क्रमांक चुकीचा आहे, अशांना समस्या निर्माण होऊ शकते. या कारणांमुळे त्यांच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते.

-तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल. जयपूरमध्ये या प्रणालीचा पायलट प्रोजेक्ट आधीपासूनच सुरू आहे.

-या प्रयोगात तेल कंपन्या 95 टक्के यशस्वी झाल्या आहेत. ही प्रणाली केवळ घरगुती सिलेंडर्सवर लागू करण्यात येणार आहे, कमर्शिअल सिलेंडर्सवर नाही.

Share post
Tags: 1 NovemberChangesDACHome DeliveryLPG CylinderLPG GasNew Delhi
Previous Post

पिंप्राळ्यातील हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी केले जेरबंद 

Next Post

Twitter Down : जगभरात ट्विटर डाऊन, युजर्सला फटका

Next Post
twitter all india down

Twitter Down : जगभरात ट्विटर डाऊन, युजर्सला फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group