पारोळा प्रतिनिधी । शहरातील राममंदीर चौकातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर पोलीसांनी कारवाई केली असून पारोळा पोलीस ठाण्यात चालकासह दोन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर पोलीसांची कारवाई .
शहरातील राम मंदीर चौकातून ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास ट्रक्टर (एमएच ३४ एल ८२३४)ने बेकायदेशीर वाळूची वाहतूक करीत असतांना पारोळा पोलीसांनी ट्रक्टरला अडवून वाहतूकीचा परवाना मागितला.
वाहतूकी करण्याचा कोणताही परवाना नसल्याने पोलीसांनी पारोळा पोलीस ठाण्यात ट्रक्टर जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबर रविंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून चालक रामकृष्ण भीकन धनगर (वय-३५) रा. विचखेडा, मदत करणारे घनश्याम भिमराव पाटील (वय-३७) रा. व्यंकटेश नगर पारोळा आणि गोविंदा तुळशीराम पाटील रा. पाठक गल्ली या तीन जणांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. विनोद साळी हे करीत आहे.