Monday, March 30, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चाळीसगावात घाट रोड परिसरातील हुडको परिसरात गोळीबार

by Divya Jalgaon Team
November 28, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
भुसावळात पुन्हा गोळीबार, जुन्या वादातून झाडल्या गोळ्या

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील घाट रोड परिसरातील हुडको परिसरात सायंकाळी झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमी झालेल्या तरूणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चाळीसगाव येथील घाट रोड परिसरातील हुडको भागात सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्तींनी यामाहा कंपनीच्या गाडीवर येऊन अचानक गोळीबार केला.

यात तीन गोळ्या झाडल्या गेल्या असून एक गोळी हवेत फायर झाली तर दुसरी जमिनीवर फायर झाले, असून एक गोळी शेख जुगर शेख वसीम या तरुणास मांडीवर लागल्याचे वृत्त असून सदर जखमी करून शहरातील देवरे हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याचे समजते. गोळीबाराची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन पाहणी करून पुढील कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे.

चाळीसगाव येथील घाट रोड परिसरातील हुडको भागात मदिना मशिदीजवळ सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्तींनी यामाहा कंपनीच्या गाडीवर येऊन अचानक गोळीबार केला. यात तीन गोळ्या झाडल्या गेल्या असून एक गोळी हवेत फायर झाली तर दुसरी जमिनीवर फायर झाले आहे. यात एक गोळी शेख जुगर शेख सलीम (बंबैय्या) या तरुणास मांडीवर लागल्याचे वृत्त असून सदर जखमी करून शहरातील देवरे हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. या तरूणाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भरदिवसा चाळीसगाव शहरातील गजबजलेल्या वस्तीत घडलेल्या या प्रकाराने शहरातील वातावरण अचानक भितीदायक झाले असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन पाहणी करून संशयितांचा शोध सुरू केला आहे.

Share post
Tags: Chalisgaon crime newsCrime newsJalgaonMarathi Newsचाळीसगावात घाट रोड परिसरातील हुडको परिसरात गोळीबार
Previous Post

सर्वात ‘स्लिम’ 5G मोबाईल भारतात होतोय ‘लाॅंच’; जाणून घ्या ‘फिचर्स’

Next Post

शिरसोली येथे किरकोळ कारणावरून मुलासह आईला बेदम मारहाण

Next Post
जळगावातील गुरूनानक नगरात दोन गटात हाणामारी

शिरसोली येथे किरकोळ कारणावरून मुलासह आईला बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group