जळगाव – दुर्लक्षित समाजासाठी लढणारे असे एक असामान्य व्यक्तिमत्व केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा ही पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय , ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय व किलबिल बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप केदार यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यना महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती संगीतली तर या प्रसंगी विद्यार्थ्यांची ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा सुद्धा घेण्यात आली.प्रसंगी शाळेच्या मुख्या.रेखा पाटील , मंजुषा चौधरी , पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे , डि. ए. पाटील , देवेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले तर यशस्वीतेसाठी सूर्यकांत पाटील , तडवी सर , बाविस्कर सर सुधीर वाणी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.