जळगाव – स्थूलता अनेक विकारांना जन्म देऊ शकते म्हणून स्थुलतेचे निवारण वेळीच करणे आवश्यक असते. योगिक जीवन शैली आणि योगिक आहाराने स्थूलतेचे निवारण करणे शक्य आहे. असा मोलाचा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त योग थेरपिस्ट डॉ. तनु वर्मा यांनी आपल्या ऑनलाईन जाहीर व्याख्यानातून दिला.
आरोग्यविषयक जाणीव जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने जे विविध दिवस साजरे केले जातात त्यापैकी २६ नोव्हेंबर हा दिवस स्थूलता निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्थूलता निवारण दिनाचे औचित्य साधून26 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 4 वाजता सर्वांसाठी उपयुक्त असे जाहीर ऑनलाईन व्याख्यान मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. केवळ शारीरिक व्यायाम करून स्थूलता निवारण करणे शक्य नसून त्याला योगिक आहार विहाराची जोड देणे आवश्यक आहे. त्यासोबतच योगिक प्रक्रियांचा अभ्यास आणि दृढ संकल्प शक्तीने स्थूलता निवारण सहज शक्य आहे,असे मत त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाची सुरुवात ओंकार प्रार्थनेने करण्यात आली. प्रास्ताविक सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी चे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी केले. प्रास्तविकातून त्यांनी स्थूलता निवारण दिनाचे महत्व सांगितले. 26 नोव्हेंबर या दिवसाच्या महत्वावर प्रकाश टाकून २६/११ च्या हल्ल्यामध्ये शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच भारतीय संविधान दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच विभागातील विविध उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत मा. नंदकुमार बेंडाळे, मविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सं. ना. भारंबे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी निसर्गोपचारसमन्वयक योग निसर्गोपचार तज्ञप्रा. अनंत महाजन आणि प्रा. सोनल महाजन यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच प्रा. पंकज खाजबागे यांनी तर आभार प्रा. अनंत महाजन व्यक्त केले. एम. ए. योगिक सायन्स आणि योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु असल्याची माहिती विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी यावेळी दिली. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बी. ए, आणि एम. ए. योगिक सायन्स, निसर्गोपचार पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तसेच अनेक योग- निसर्गोपचार प्रेमी साधकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.