जळगाव : जिल्ह्यातील नामवंत उदयोजक सुनील झंवर यांच्या जळगाव शहरातील रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कुलच्या खान्देश कॉम्लेक्समधील कार्यालयात आज सकाळी आर्थिक गुन्हे शाखेच्या मुंबईच्या पथकाने अचानक येत धाड टाकल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चौकशी नेमकी कशासाठी झाली याचा अद्याप खुलासा होऊ न शकल्याची माहिती समोर आली असून बीएचआरचे अवसायक
उद्योजक सुनील झंवर याचे जिल्ह्यातील बड्या राजकारण्यांशी जवळचे संबंध आहेत . माजीमंत्री गिरीश महाजन , माजी महापौर नितीन लढडा यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. तसेच नुकतेच भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला राम राम करून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे .
त्यामुळे एकनाथराव खडसे यांचे या धाडसत्रांमध्ये हात तर नाही ना ? अशी शंका उपस्थित केली जात आहे. एकनाथराव खडसे यांनी विरोधी पक्षनेते असताना अनेकांची प्रकरणे बाहेर काढली आहे. त्यामुळे ते आता सत्ताधारी पक्षात गेल्याने पडद्यामागून सूत्रे तर हलवीत नाही असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. एकनाथराव खडसे आणि आ. गिरीश महाजन यांच्यातील छुपे वैर संपूर्ण राज्याला माहीत आहे .
तसेच सुनील झंवर हे आ. महाजन यांचे कट्टर समर्थक मानले जातात . त्यामुळे त्यांच्या कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेचा छापा हा राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरून झाला असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. याबाबत सुनील झंवर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत प्रतिनिधीने घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही . माजी महापौर नितीन लढा यांचीही चौकशी केली गेल्याची अफवा होती . त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी कुठलीही कारवाई आपल्याकडे झाली नसल्याबाबतचा खुलासा केला .
एका पथकाला कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी थांबवून नवटके संस्थेच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात दाखल झाल्या. येथे ४५ जणांच्या पथकाने चौकशीचे सूत्र हाती घेतले. त्याशिवाय उद्योजक सुनील झंवर, पतसंस्था ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे आदींच्या निवासस्थानी झडती सुरु होती.परंतू आयकर विभागाचे पथकाने काय तपासणी केली याची माहिती मिळू शकली नाही. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची तपासणी सुरूच असून तपासणी नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात येत आहे. याची माहिती मिळू शकली नाही.
१३५ जणांचे पथक जळगावात दाखल
शहरातील बीएचआरप्रकरणातील अपहार तसेच फसवणूक प्रकरणात चौकशीसाठी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनासाठी 136 जणांचे पथक शुक्रवारी सकाळी जळगावात धडकले आहेत. वेगवेगळ्या गाड्यांमधून आलेले पथकांकडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्ररित्या चौकशी केली जात आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्था, त्याचे प्रशासक व इतर तीन अशा पाच ठिकाणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी एकाच वेळी छापे टाकले. दोन पोलीस उपायुक्त, तीन सहायक उपायुक्त, नऊ पोलीस निरीक्षक, १० सहायक/उपनिरीक्षक अशा एकूण १३५ जणांचे पथक जळगावात दाखल झाले.