जळगांव : गौतम नगर तांबापुरात संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. तसेच भगवान गौतम बुद्ध विहार येथे पुष्पहार वाहण्यात आले तर संविधान निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व खिरदान करण्यात आले.
सदर कार्यक्रमात आर.पी.आय (आ) जळगांव युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, लुम्बिनी बौद्ध विहार चेअरमन बाजीराव ससाणे, समाजिक कार्यकर्ते नागेश वारूळे, सामाजिक कार्यकर्ते मंगल वाघ, अनिल तायडे, मिलिंद वाघ, प्रकाश वाघ, रमेश अहिरे, प्रविण वाघ, अविनाश पारधे, जिभाऊ वाघ, छोटु सोनवणे, पिन्टु वाघ, राज सोनवणे, गोलू सोये, गोलू सोनवणे, भैय्या नन्नवरे, चंदू बागुल, राजू वाघ, किशोर घोडेस्वार, सतिष सोनवणे, अनिल सोनवणे, अविनाश नन्नवरे, राज अहिरे, महिद खैरनार, प्रविण ससाणे, प्रदीप वारूळे, भगवान ससाणे सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान गौरव दिनाचा घोषणा देण्यात आल्या व मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.