चोपडा – येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अविनाश गांगुर्डे मुख्य कार्यकारी अधिकारी न.पा.चोपडा, अवतांरसिंह चव्हाण पोलीस निरीक्षक,यांच्या हस्ते हार घालण्यांत आला.व त्रिशरण,पंचशील, भिमस्मरण,भिमस्तुती,ग्रहण करण्यात आले.तसेच संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यांत आले.मान्यवर व पदाधिकारीनी संविधान दिनाविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने तयार करण्यांत आलेले धम्मयान दिनदर्शिका २०२१चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यांत येवून वितरण करण्यांत आले.
यावेळी न.पा. गटनेते जीवनभाऊ चौधरी, नगरसेवक अशोकबाबा बाविस्कर, नगरसेवक रमेशभाऊ शिंदे, माजी सभापती गोपाळराव सोनवणे,तालुकाध्यक्ष बापूराव वाणेसर,शहराध्यक्ष भरत शिरसाठसर,जिल्हा संघटक हितेंद्र मोरेसर,समाधान सपकाळे, बार्टीचे हर्षल सोनवणे,महेंद्र मराठे,परेश पवार, मिलिंद सोनवणे, छोटूवारडे, दिवाणजी सांळुखे,समाधान सोनवणे,हिरालाल बाविस्कर, सुकदेव बाविस्कर, दिपक भालेरावआदी भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थिताचे आभार हितेंद्र मोरे यांनी मानले .