भुसावळ प्रतिनिधी । भुसावळात शालकाने केला मेहुण्याचा खून. बहिण व भाच्याच्या मृत्यूस आपला मेव्हणाच जबाबदार असल्याचा डूख मनात धरून एकाने आपल्या मित्रासह मेव्हण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मयत राजु शामराव मिरटकर (वय २८,रा.मोताळा) हा भुसावळ येथे बहिणीकडे वास्तव्यास होता. राजू हा मे २०२० मध्ये पत्नी व मुुलासह सासरी दुचाकीवरुन जात असतांना झालेल्या अपघातात पत्नी व मुलाचा मृत्यू होऊन यात मयत बचावला होता. त्यामुळे शालक रामेश्वर गायकवाड (वय २२, रा.कोथळी ता.मोताळ. जि.बुलढाणा) याला आपल्या मेव्हण्याने बहिणीला मारल्याचा संशय होता. त्यातून त्याने राजु याला संपविण्याचा डाव रचला. या अनुषंगाने ९ ऑक्टोबर रोजी राजु हा भाच जावायासोबत मोताळा येथे गेला होता.
तेथून तो परतला नव्हता. याबाबत मयत राजुची बहिण सुनीता युवराज पवार (रा. यावल रोड, भुसावळ) यांनी ३० ऑक्टोबर रोजी बोरखेडी ता. मोताळा पोलिसात भाऊ हरविल्याची व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंंतर मयताचे भुसावळ येथील यावल नाका परिसरातून अपहरण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर दि.२० नोव्हेंबर रोजी हा गुन्हा भुसावळ शहर पोलिसत वर्ग करण्यात आला.त्यानंतर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पो.स्टे.चे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व एपीआय संदीप डुनगहू यांच्यासह सहकार्यांनी तपास चक्रे फिरवत रमेश रामदास पवार (रा.कंडारी, ता.भुसावळ) याला २२ रोजी ताब्यात घेऊन तपास चक्रे फिरविली. यात त्याने, राजूचा शालक रामेश्वर याच्या मदतीने त्याचा घात केल्याचे सांगितले.
त्यानंतर शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन. विचारपुस केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. दरम्यान, एपीआय संदीप डुनगडू यांनी मोताळा सह परिसरातील पोलिस ठाण्यात संपर्क करुन या घटनेच्या काळात अज्ञाता व्यक्तिच्या मृत्यूची नोंद आहे का या दिशेने तपास सुरु केला असता. जळगाव जामोद (जि. बुलढाणा) येथील पोलिस ठाण्यात दि. ३१ ऑक्टोबर २० रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर मयताची बहिण व पोलिसांनी मयताच्या कपड्यांवरुन मयताची ओळख पटविली.