जळगाव – देशांमधील पहीले सांस्कृतिक खाते महाराष्ट्रात निर्माण करून राज्याची सांस्कृतिक पायाभरणी करणारे द्रष्टे नेते म्हणजे यशवंतराव चव्हाण होय . भौतिक व सांस्कृतिक हे विकासाचे दोन डोळे आहेत , यातील एक जरी डोळा दुर्लक्षित केला तर विकासाची वाट सापडत नाही .
अस यशवंतराव चव्हाण म्हणायचे म्हणून या दोन्ही अंगाने विकास करत त्यांनी प्रगत महाराष्ट्राची उभारणी केली आहे . मराठी रंगभूमीचा 1960 ला महाराष्ट्र राज्य स्थापने नंतर खऱ्या अर्थाने विकास झाला . याला यशवंतराव चव्हाण यांनी आखलेले सांस्कृतिक धोरण व सरकारने केलेली काम या मुळे रंगभूमीच्या विकासाला गती मिळाली असे प्रतिपादन रंगकर्मी शंभु पाटील यांनी केले.
स्व यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा जळगाव यांच्या वतीने प्रतिमा पूजन व व्याख्यान असा छोटेखानी कार्यक्रम आयोजीत केला होता.
या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अंजली पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. या प्रसंगी प्रतिष्ठानचे सदस्य ज्ञानेश मोरे, शंभु पाटील, संदीप पाटील, गजानन वाघ व इतर सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी शंभु पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेत , त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोगा मांडला. कोविड 19 मुळे जाहीर कार्यक्रम न करता अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रम smit महाविद्यालयात संपन्न झाला .