जळगाव – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास शासनाने मुभा द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
या निवेदनात नमूद केले आहे की, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता येत असतात, मात्र यावर्षी राज्यसरकारने कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी भीम अनुयायांनी ऑनलाईन घरी बसूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे असे फर्मान काढले आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भिम अनुयायांमध्ये नाराजी पसरली असल्याने त्या बाबतीत राज्य शासनाने फेरविचार करून भीम अनुयायांना बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन करण्याकरीता नियमावली तयार करून अभिवादन करण्यास मुभा द्यावी या मागणीसाठी जळगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय निदर्शने करण्यात आले आहे.
हे निदर्शन महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने करण्यात आले, याप्रसंगी रमाबाई ढिवरे, युवक महानगर अध्यक्ष मिलीद सोनवणे, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, बबलू शिंदे, प्रतिभा भालेराव, अक्षय मेघे, संजय तायडे, विलास सोनवणे, मानव गायकवाड, रफिक पिंजारी, शेखर सोनवणे, प्रफुल्ल वानखेडे, चेतन चव्हाण, अरुण सोनवणे, शंकर आराक, शाहरुख पिंजारी, मुस्तक खान, प्रशांत सोनवणे, अक्षय बोदडे, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.