जळगाव प्रतिनिधी । शहरातील संविधान जागर समितीतर्फे संविधान जागर दिनानिमित्ताने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संविधान जागर दिनानिमित्ताने २६ नोव्हेंबर रोजी रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी ९ वाजता कार्यक्रम होणार आहे.
या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून सविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील संविधान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन संविधान जागर समिती संयोजक मुकुंद सपकाळे, सचिव हरिश्चंद्र सोनवणे, प्रतिभा शिंदे, अमोल कोल्हे, दिलीप सपकाळे, भारत ससाणे, डॉ. अ. करीम सालार, सचिन धांडे, सुरेंद्र पाटील, सरोजिनी लभाणे यांनी केले आहे.