जळगाव – शहरातील खंडेरावनगर येथे घराच्या दुसर्या मजल्यावरून खाली पडून जखमी झालेल्या ४ वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शौर्या हर्षल जोशी (वय ४, रा. प्लॉट क्रमांक ३८ खंडेरावनगर) ही बालिका २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घराच्या दुसर्या मजल्यावर खेळत होती. खेळत असताना तोल जावून ती खाली पडली होती.
या अपघातामुळे तिच्या डोक्याला जबर मार बसला होता. पालकांनी बेशुद्धावस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल केले असता सोमवारी तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.