यावल प्रतिनिधी । न्यायालयातील कनिष्ट लिपिकाने खोटी बिले दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. येथील न्यायालयातील एका कनिष्ट लिपिकाने व डॉक्टरासह एका अनोळखी इसमाने संगनमताने पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचाराची खोटी बिले तयार करून शासनाची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आले असुन या संदर्भात न्यायधिशांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायलयाच्या सेवेत नोकरी करणारी व्यक्तिने अशा प्रकारे शासनाची फसवणुक केल्याच्या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे .
या संदर्भात पोलीस सुत्राकडुन मिळालेली माहीती अशी की यावल येथील दिवाणी न्यायलयात कनिष्ट लिपिक म्हणुन नौकरीस असलेले विजय पंढरीनाथ सुर्यवंशी राहणार पुष्पराज अपार्टमेंन्ट सेन्ट अलायन्स हायस्कुलच्या मागे भुसावळ यांनी व पुणे येथील डॉ. अभय एन. सदरे रुबी हॉल क्लिनिक पुणे मिळुन संगनमताने ९ / ०२ / २० १६ते १३ / ०९ / २०१९पावेतो वेळोवेळी यावल न्यायलयात व
इतर ठिकाणी रुबी क्लिनिक पुणे यांच्याकडील औषद्य उपचाराची खोटी कागदपत्रे व बनावट बिले बनवुन एका अनोळखी व्यक्तिच्या यांच्या सोबत संगमताने मिळुन खोटया सह्याची कागदपत्रे सादर करून बिलामध्ये नमुद केलेले खर्च झालेले नसतांना खोटी
बिलांची प्रतिपुर्ती बिले ही खरी असल्याचे भासवुन वैद्यकीय बिलाची रक्कम १४ लाख२७ हजार६७० रूपयांमध्ये शासनाची फसवणुक केल्याचे उघडकीस आले.
यावल येथील दिवाणी न्यायलयाचे न्यायाधिश दिलीप गंगाधर जगताप यांनी याबाबत यावल पोलीस तक्रार दाखल केल्याने पोलीसांनी संशयीत आरोपी विजय पंढरीनाथ सुर्यवंशी रा . भुसावळ
डॉ . अभय एन . सदरे व एका अनोळखी व्यक्ति विरूद्ध भाग५ भादवी कलम४२० , ४६५ , ४६८, ४७१ , १६ ५ , ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास जेष्ठ पोलीस उपनिरिक्षक ए .आय. पठान व पोलीस कर्मचारी करीत आहे.
अजून वाचा
जळगावातील दाणाबाजारातून दुचाकीची चोरी: गुन्हा दाखल