जळगाव – कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर दिवाळी सणानिमित्त नोव्हेंबर- 2020 साठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति कुटुंब एक किलो साखर 20 रुपये दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील 4 लाख 70 हजार 950 कुटुंबांकरीता 4 हजार 730 क्विंटल साखर नियतन मंजुर करण्यात आले आहे. ही साखर तहसिलदार यांचेमार्फत जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन 1 किलो साखर 20 रुपये दराने घ्यावी. असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.