जळगाव – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या जळगाव केंद्राच्या वतीने आज सोमवार २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. ऑनलाईन कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा माजी उपपंतप्रधान व माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांचा बुधवारी स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या जळगाव केंद्राच्या वतीने आज सोमवार २३ रोजी सायंकाळी ६ वाजता ऑनलाईन कवी संमेलन होणार आहे. या काव्यसंमेलनात अशोक सोनवणे, ज्ञानेश मोरे, अशोक जोशी, माया धुप्पड, योगिता पाटील हे सहभागी होणार असून प्रा. दीपक पवार हे सुत्रसंचालन करणार आहेत.
केंद्राचे अध्यक्ष अॕरवींद्रभैय्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. गुगलमिट द्वारा होणाऱ्या या कवीसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्राचे पदाधिकारी सुनील पाटील, शंभु पाटील, निशाभाभी जैन, प्रा. एन. डी. पाटील, अपर्णा भट, अंजली पाटील, अशोक सोनवणे, ज्ञानेश मोरे यांनी केले आहे.