जामनेर (सुमित पाटील) – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी दिगर येथे १५ ऑक्टोबर या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केली जाते,वाचन संस्कृती रुजावी,वाढावी विद्यार्थी व सर्वांनाच वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.मात्र या वर्षी कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने वडाळी दिगर येथील उपशिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जात त्यांना पुस्तक भेट दिले तसेच वाचनाचे महत्त्व सांगितले.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांचे रोज वाचन घेत राहावे,अभ्यासाचे महत्त्व याबाबत माहिती दिली.संदिप पाटील यांनी वाचन प्रेरणा दिनानिमत्त राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.