जळगाव : पाळधी जवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६ वर तोतला पेट्रोल पंपासमोरील हॉटेल साईनाथ ढाबाचे मालक किरण त्र्यंबक नन्नवरे यांच्यावर काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गुंड्यानी जबर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात हॉटेल माल त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काल रात्री सात वाजेच्या सुमारास बांभोरी येथील राहुल राजु सपकाळे व त्यांच्यासोबतच्या दोन जणांनी साईनाथ ढाबाचे मालक किरण त्र्यंबक नन्नवरे यांना दर महिन्याला दहा हजार रुपयांची खंडणी मागूनही तू का देत नाही अशी विचारणा करून जेवणाचे बिल न देता मारहाण सुरू केली. काही वेळाने सपकाळे यांनी फोनवरून गावातील पद्माकर नन्नवरे, सोपान नन्नवरे, राजू सपकाळे, रुस्तमजी नन्नवरे व व आणखी सात आठ जणांना बोलवून घेतले. या सर्वांनी मिळून नन्नवरे यांच्यावर जबर हल्ला करून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत केली. यावेळी हल्लेखोरांनी खुर्च्यांची फेकाफेक करून हॉटेलचे नासधुस केली आहे. हल्लेखोरांनी हॉटेलच्या काउंटर मधून दहा ते पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली आहे.
ही सर्व घटना हॉटेलमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून यावेळी हॉटेलमधील ग्राहकांची पळापळ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकाराने हायवेवरील हॉटेल चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिलेल्या माहितीनुसार राहुल राजु सपकाळे, पद्माकर नन्नवरे, सोपान नन्नवरे, राजू सपकाळे, रुस्तमजी नन्नवरे व इतर अनोळखी (सर्व राहणार बांभोरी तालुका धरणगाव) हे मागील काही दिवसापासून हॉटेल चालू ठेवण्यासाठी दरमहा दहा हजार रुपयांची खंडणी मागत होते. मागण्यासाठी काल संबंधितांनी जीवघेणा करून ठाणे वाळूचा धंदा करत असून वाळूच्या ट्रॅक्टरखाली तुला चिरडून मारून टाकू अशी धमकी देतात काउंटर मधून पैसेही लुटून नेले आहेत. या गुंडांमुळे मला व माझे कुटुंबीयांच्या जीविताला धोका असून आमच्या जीविताचे संरक्षण करावे अशी मागणी केली आहे.
तसेच हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात नन्नवरे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी घटना घडूनही अद्यापपर्यंत दवाखान्यात पोलिसांनी हॉटेल मालकाची जाबजबाब घेतले नसल्याची माहिती मिळाली आहे.