जळगाव – शहरातल्या पिंप्राळा परिसरातील वृध्द महिला गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता झाल्या आहेत. त्यांच्या पतीने दिलेल्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातल्या पिंप्राळा परिसरातील चिंचपूरा गल्ली राहणारे मुरलीधर नारायण कोष्टी (वय-७०) हे आपल्या पत्नी कमलबाई मुरलीधर कोष्टी (वय-६५) सह राहतात. त्यांना एक विवाहित मुलगी आहे. दैनंदिन प्रमाणे त्या कामाकाज करून घरी सायंकाळी ओट्यावर बसल्या.
अंदाजे गेल्या दोन महिन्यांपुर्वी कमलबाई ह्या बाहेर फिरून येते असे पती मुरलीधर कोष्टी यांना सांगून घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्यांचे पती मुरलीधर कोष्टी आणि मुलगी यांनी इतरत्र शोधाशोध सुरू केली. आजपर्यंत त्या आढळून किंवा मिळून आले नाही. अखेर पती मुरलीधर कोष्टी यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.