Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्वच्छ भारत मिशन सप्ताहाचा ना. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

by Divya Jalgaon Team
November 19, 2020
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

जळगाव:-  स्वच्छता हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असून सुदृढ आरोग्यासाठी देखील आवश्यक असल्याने परिसराला शाश्‍वत स्वच्छतेत टिकवून धरण्यासाठी शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जागतिक स्वच्छता दिनानिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या ठिकाणी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील होते.

जागतिक शौचालय दिनानिमित्त जि. प. आवारात स्वच्छतेबाबत विनोद ढगे व सहकार्‍यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छताबाबत जनजागृती केली.

२३ हजार कोटींची योजना पूर्ण करणार

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यातील एकही गाव स्वच्छ पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने योजना आखली आहे. पाण्यासोबतच एकही गाव स्वच्छतागृहाविना राहू नये हा देखील सरकारचा प्रयत्न असून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे २०२३ पर्यंत तब्बल २३ हजार कोटींची योजना पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच जिल्ह्यात साडेपाच लाख व्यक्तिगत स्वच्छतागृहे आहेत, आणखी त्यात वाढ होणार होणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह; राज्यात पहिला प्रयोग

ना. पाटील पुढे म्हणाले की, दिव्यांगांसाठी जिल्ह्यात स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून पालकमंत्री यांच्याहस्ते स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत हे काम होणार आहे. जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनेत देशात जिल्ह्याचा तिसरा तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहे. याबद्दल पालकमंत्र्यांनी जि.प.अध्यक्षांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.

स्वच्छतेचा संदेश जिल्ह्याभरात देण्यासाठी १९ ते २७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात स्वच्छता मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते मशाल यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील गावागावात जाऊन मशाल यात्र स्वच्छतेचा संदेश देणार आहे.

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील , उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण  सभापती जयपाल बोडडे, आरोग्य सभापती रविंद्र पाटील,  माजी उपाध्यक्ष नंदकिशोर पाटील , जि. प , सदस्य नाना  महाजन,  अमित देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, अति.मु.का.अधिकारी गणेश चौधरी  , ग्रा. प.  चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोटे , जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share post
Tags: Divya Jalgaon NewsGulabrao PatilJalgaonJalgaon newsMarathi NewsPoliticalस्वच्छ भारत मिशन सप्ताहाचा ना. पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
Previous Post

मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर केली दंडात्मक कारवाई

Next Post

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंना कोरोनाची लागण

Next Post
Breaking : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group