Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हिरापूर येथील भुयारी रेल्वे पूल मार्गाचे काम तात्काळ करावे

by Divya Jalgaon Team
November 18, 2020
in जळगाव
0
हिरापूर येथील भुयारी रेल्वे पूल मार्गाचे काम तात्काळ करावे

चाळीसगाव – तालुक्यातील हिरापुर येथे रेल्वेचा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्गाच पंचक्रोशीतील हिरापुर, ब्राम्हणशेवगे, माळशेवगे, पिंपळवाड,अंधारी, तमगव्हाण, हातगाव,शेवरी, नाईकनगर इ.गावांचा एकमेव रहदारी  मार्ग आहे.

मागील काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने याठिकाणी लोखंडी पाईप लावून जड वाहतूक बंद केलेली आहे. रेल्वे पुलाखालून  यामुळे एस.टी.बसेस ही जात नाही. भुयारी मार्गाची अतिशय दयनीय स्थिती झाली आहे. या गावांना या पुलाखालून  जाण्याशिवाय दुसरा  पर्याय नसल्यामुळे पावसाळ्यात तर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने व रस्त्याचा अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात नेहमीच होत असतात. पंचक्रोशीतील बरेच  शालेय विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी चाळीसगाव येथे ये जा करत असतात. एसटी बससेवा यामुळे विस्कळीत झाली आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पोस्टाच्या गाड्याही यामुळे बंद झाल्याने त्या यंत्रणेवरही विपरीत परिणाम झाला आहे. तसेच वैद्यकिय उपचारासाठी वेळेवर जाता येत नाही. अँब्यूलन्स सेवा ही यामुळे वेळेवर मिळत नाही. स्वस्त धान्य पुरवठा करणारे वाहन असो की शेतीमाल वाहणे या भुयारी मार्गाने आणता येत नसल्याने या भुयारी मार्गात रेल्वे प्रशासनाने लावलेल्या लोखंडी पाईप व पुलाखालील रस्याची झालेली दयनीय अवस्था यामुळे या द्विधा अडचणीत पुलाखालून नाईलाजाने वाहतूक करणारी पंचक्रोशीतील  गावे अगतीच त्रस्त झाली आहेत.यामुळे या गावांचा एकप्रकारे विकास खुटण्यास हा रेल्वे भुयारी मार्ग जबाबदार आहे .

या बाबतीत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काही ही फायदा झाला नाही. उलट रेल्वे अधिकारी हा रस्ता रेल्वेच्या अधिपत्याखाली आहे तसेच हा रहदारीचा रस्ता नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे देतात किंवा रस्ता कायमचा बंद करून देण्याची धमकी देतात.त्यामुळे या रेल्वे भुयारी मार्ग काँक्रिटीकरण करून पंचक्रोशीतील गावांना होणारा त्रास थांबवावा अशा मागणीचे तसेच ग्रामपंचायत ठरावाचे निवेदन खासदार उन्मेश पाटील यांना हिरापुर रेल्वे पूल समन्वय समितीतर्फे देण्यात आले.

यावेळी हिरापुर येथील भैयासाहेब पाटील, सुधीर शिंदे, संता पहिलवान, अनिल कापसे,अंधारी येथील सरपंच तान्हाजी वाघ, पोलीस पाटील शरद नागरे,आनंदा वाघ,प्रफुल्ल पाटील, हातगाव सरपंच दत्ता नागरे,तमगव्हाणचे पत्रकार सुनिल पाटील, पिंपळवाड नि.चे माधव वाघ, शिरिष जगताप, ब्राम्हणशेवगे येथील सोमनाथ माळी उपस्थित होते.

Share post
Tags: #Hirapur#Jalgaon chalisgaon latest newsChalisgaon NewsDivya Jalgaon NewsMarathi NewsMP Unmesh Patilहिरापूर येथील भुयारी रेल्वे पूल मार्गाचे काम तात्काळ करावे
Previous Post

मंगलपोत लांबविणारे दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

Next Post

जळगावातील आकाशवाणी चौकात कारने घेतला पेट

Next Post
Video : जळगावातील आकाशवाणी चौकात कारने घेतला पेट

जळगावातील आकाशवाणी चौकात कारने घेतला पेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group