Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बॉडी बिल्डिंगसाठी जिममध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांवर नियंत्रण आणावे

by Divya Jalgaon Team
November 18, 2020
in जळगाव
0
बॉडी बिल्डिंगसाठी जिममध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांवर नियंत्रण आणावे

जळगाव-  जिम लावून शरीर पिळदार करण्याचा ट्रेंड सध्या चांगलाच जोर धरत आहे.  शहरासह संपूर्ण देशात गेम संकृती वाढत असून यात जिमचे महत्व वाढीस लागत आहे. या जिममध्ये शरीर पिळदार करण्यासाठी काही युवक यंत्राच्या सहाय्याने व्यायामासोबत काही औषधे घेत असतात, अशी औषधे शरीरास घातक असून यांच्यावर सरकारने नियंत्रण आणावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर निवेदनात नमूद केले आहे की,   जिममध्ये यंत्रांच्या साह्याने व्यायाम करून व त्यासोबत काही औषधे घेऊन व सल्ला यानुसार अनेक युवकांचे जीवन संकटात आले आहे. या औषधांमुळे शरीर अधिक पिळदार होते. मात्र  त्यांचे दुष्परिणाम इतके भयंकर असतात की माणसाला जीवनातून उठविण्याचे प्रकार घडतात. बॉडी बिल्डिंग करण्याची मोठी फॅशन आहे. प्रत्येकाला आपले शरीर पिळदार हवे आहे. त्यासाठी ते लोक काहीही करायला तयार असतात.

कोणीही सांगितलेल्या सल्ला अंमलात  आणतात मग त्यामुळे शरीराचे कोणतेही भाग निकामी झाले तरी मागे पुढे पाहिले जात नाही. मागील वर्षी मुंबईतील एका तरुणास त्याच्या आईने किडनी देऊन वाचवले होते. कारण त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. कारण त्याने शरीर पिळदार बनविण्यासाठी कृत्रिम पोषक आहार घेतात. औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले पाहिजे. शरीरावर होणारे परिणाम यांची प्रत्येकाला माहिती असले पाहिजे.

संपूर्ण जीम व फिटनेस सेंटर चालणाऱ्या तसेच घातक औषधी यांच्यावर सरकारचे नियंत्रण असावे. तसेच प्रत्येक ट्रेनर हा विशिष्ट ट्रेनिंग घेतलेला असावा जेणेकरून असे तरुणाची नुकसान होणार नाही. तरुण या प्रकाराने आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा करत आहेत. त्यास आळा घालण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. शहरासह राज्यात देशपातळीवरील सरकार यांनी याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर कादरिया फाउंडेशनचे फारुख कादरी, लोकसंघर्ष मोर्चा सचिन धांडे, अमन एज्युकेशन सोसायटीचे शहीद सय्यद, जावेद शाह बिल्डर, एनोद्दिन शेख आदींनी  स्वाक्षरी केल्या  आहे.

Share post
Tags: Divya Jalgaon NewsJalgaon Latest NewsMarathi Newsबॉडी बिल्डिंगसाठी जिममध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांवर नियंत्रण आणावे
Previous Post

भाजपा नेते राम कदम यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post

मंगलपोत लांबविणारे दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

Next Post
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

मंगलपोत लांबविणारे दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group