जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा स्पोर्टस् फाउंडेशनची नुकतीच स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठा समाजातील होतकरू मुलांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने जळगाव जिल्हा मराठा स्पोर्टस् फाउंडेशनची स्थापना केली आहे. संस्थेचे लोगो अनावरण व कार्यपुस्तीकेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे.
सकल मराठा समाजातर्फे पुढील काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात जिल्ह्यातील मराठा समाजातील शाहिद सैनिकांच्या वारसांना मदत निधी, वधू वर परिचय मेळावे, जळगाव जिल्ह्यातील व्यावसायिकांची डिक्शनरी, एमपीएससी व युपीएससीच्या मुलांना अभ्यासासाठी लागणारे साहित्य, मराठा क्रिकेट लीग घेणे आदींचा समावेश असणार आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा मराठा स्पोर्टस् फाउंडेशन कार्यकारिणीत अध्यक्ष इंजिनिअर शंभू सोनवणे, कार्याध्यक्ष गोपाळ दर्जी, सचिव सागर पाटील, खजिनदार जयांशू पोळ यांच्यासह नगरसेवक सचिन पाटील, नीलेश पाटील, चंद्रशेखर पाटील, सुनील सोनवणे, दीपक आर्डे यांचा समावेश आहे.