जळगाव प्रतिनिधी । आज सकाळपासून राज्यातील देवस्थाने उघडली असून या निर्णयाचे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चिमुकले राम मंदिरात महाआरती व आतषबाजी करून स्वागत करण्यात आले.
आज सकाळपासून राज्यासह जिल्ह्यातील देवस्थाने उघडली असून याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. या अनुषंगाने असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या चिमुकले राम मंदिरात आज मनसेतर्फे आरती करून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तर यासोबत याच मंदिरासमोर मनसेतर्फे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश कार्यकारणीचे नेते अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, तालुकध्यक्ष मुकुंद रोटे, मनविसे शहराध्यक्ष योगेश पाटील, संदीप मांडोळे, पंकज चौधरी, संदीप महाले, योगेश विसपुते, गोरख गायकवाड, तुषार तळेले, अजित बरेला, विशाल मोरे, गोविंद जाधव, डॉ दीपक सोनार, अविनाश जोशी आदींची उपस्थिती होती.