Tuesday, June 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महायुतीची भक्कम ताकद नंदकिशोर महाजनांच्या पाठीशी!

by Divya Jalgaon Team
June 16, 2026
in जळगाव, राजकीय
0
महायुतीची भक्कम ताकद नंदकिशोर महाजनांच्या पाठीशी!

जळगाव – विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला असून, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर त्यांनी आपला मुख्य भर दिला आहे. महायुतीमधील सर्वच घटक पक्षांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी शक्ती उभी केल्याने महाजन यांचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे.

संख्याबळाचे गणित महायुतीच्या बाजूने
या निवडणुकीत महायुतीकडे स्पष्ट आणि भक्कम बहुमत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. मतदारसंघात पक्षीय बलाबल भारतीय जनता पक्षाचे २५२, शिवसेना शिंदे गटाचे १८६ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ३५ नगरसेवक जिल्ह्यात आहेत.

या सर्व ४७३ हून अधिक नगरसेवकांनी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा आणि त्यांना घवघवीत बहुमताने विजयी करण्याचा ठाम संकल्प केला आहे.

कृषी क्षेत्राचा प्रगल्भ अभ्यास आणि ‘केळी’ उत्पादकांसाठी नवी आशा
नंदकिशोर महाजन यांची ओळख कृषी क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आहे. शेतीमधील विविध आधुनिक संकल्पनांवर आणि तंत्रज्ञानावर त्यांचा मोठा अभ्यास आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाबाबत त्यांचा गाढा अभ्यास आहे.

“नंदकिशोर महाजन हे विधानपरिषदेच्या माध्यमातून आगामी काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणतील आणि केळी पिकाला सोन्याचे दिवस मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील,” अशी आशा संपूर्ण जिल्हावासीयांना लागून आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना मिळणार वाचा
केवळ शेतीच नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या विविध समस्यांची महाजन यांना जाण आहे.

विधानपरिषदेच्या सभागृहात महाजन हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांवर नक्कीच आवाज उठवतील आणि त्याचा थेट फायदा जनविकासासाठी होईल, असा विश्वास मतदारसंघातील नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. महाजन यांच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांची विजयी घोडदौड सुसाट सुरू असल्याचे दिसत आहे.

Share post
Tags: #BJPJalgaon#FarmerLeader#JalgaonPolitics#MaharashtraPolitics#Mahayuti#MahayutiCandidate#MLCElection#NandkishorMahajan#NandubhauMahajan#VidhanParishadbjpJalgaon
Previous Post

नंदूभाऊ महाजन : शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आता विधानपरिषदेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group