Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

“फेम” आयोजित स्पर्धेत पालवी जैनच्या ” स्वदेशी खरेदी करा” आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार !

by Divya Jalgaon Team
December 8, 2025
in Uncategorized
0
“फेम” आयोजित स्पर्धेत पालवी जैनच्या ” स्वदेशी खरेदी करा” आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार !

जळगाव – देशाला विश्वस्तरावर अग्रस्थानावर नेण्यासाठी सरकारस्तरावर होणाऱ्या विविध योजनांपैकी एक असणाऱ्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊन देशातल्या व्यावसायिकांना मुख्य धारेत आणून राष्ट्राला मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त फेम ( फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग इंटरप्रीनर्स) आयोजित आर्टवर्क स्पर्धेत ” स्वदेशी खरेदी करा” आवाहन करणारे आर्टवर्क महाराष्ट्रभरातून जाहिरात संस्था, कला महाविद्यालय आणि व्यावसायिक कलाकारांकडून मागवण्यात आले होते. या स्पर्धेत जळगावच्या पालवी जैन हिच्या कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तिच्या आर्टवर्कमधे परदेशी “प्रादा” पादत्रांणासोबत आपल्या कोल्हापुरी चप्पल अभिमानाने मिरवत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रादा या ब्रँड ने कोल्हापुरी चपलेचे डिझाईन कॉपी केल्याने एक वाद सोशल मीडियावर खूप ट्रेंड झाला होता, या वादाच्या पार्श्र्वभूमीचा धागा पकडत पालवीने हे आर्टवर्क सादर केले होते. अकरा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री अशोक जैन, चित्रकार विकास मल्हारा, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील तसेच राज्यातील कला आणि जाहिरात क्षेत्रातील तसेच जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पालवीचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. पालवी जैन नीलिमा जैन आणि जैन इरिगेशनचे कला विभागाचे श्री विजय जैन यांची मुलगी आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत पालवीचे वडील श्री. विजय जैन यांनी सुध्दा सहभाग घेतला होता.

Share post
Tags: #Buy local#स्वदेशी खरेदी कराजैन इरिगेशन
Previous Post

देवयानी पाटील हिला कांस्यपदक

Next Post

जामनेरच्या तरुणाचा खून; गळा दाबून हत्या करून मृतदेह धरणात फेकला

Next Post
जामनेरच्या तरुणाचा खून; गळा दाबून हत्या करून मृतदेह धरणात फेकला

जामनेरच्या तरुणाचा खून; गळा दाबून हत्या करून मृतदेह धरणात फेकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group