जळगाव प्रतिनिधी । शहरातील हॉटेल कस्तूरीजवळ कारमधून बेकायदेशीर विनापरवाना देशी विदेशी दारूची कारमधून वाहतूक करणाऱ्या मुद्देमालासह कारचालकाला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील मुद्देमाल व कार हस्तगत करण्यात आली. एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील हॉटेल कस्तूरीजवळ कारमधून बेकायदेशीर देशी विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली. गुप्त माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एमएच ०२ जेपी ००७१) मधील कार चालक संशयास्पदरित्या हालचाली करत असतांना दिसून आला.
वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डीक्कीतून १२ हजार ४८० रूपये किंमतीची विदेशी दारू आढळून आली. कारचालक राजेंद्र पुंडलिक चांदेकर (वय-५६) रा. सुतार गल्ली, तोंडापूर ता.जामनेर याला अटक केली असून कारसह देशी विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस कॉस्टेबल विजय बावस्कर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.कॉ. सचिन पाटील, योगेश बारी, विजय बावस्कर यांनी कारवाई केली.